हातभट्टीचा अड्डा उध्वस्त; अडीच हजार लिटर गावठी दारू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:27 PM2019-04-16T20:27:48+5:302019-04-16T20:28:50+5:30

मानपाडा पोलिसांची कारवाई

Twenty two thousand liters of barley liquor seized | हातभट्टीचा अड्डा उध्वस्त; अडीच हजार लिटर गावठी दारू जप्त

हातभट्टीचा अड्डा उध्वस्त; अडीच हजार लिटर गावठी दारू जप्त

Next
ठळक मुद्देभरारी पथकामार्फत ४ गुन्हे दाखल करत सुमारे १० लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच, दारूबंदीचे ११८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणी मानपडा पोलिसांनी विष्णू पाटील याच्या सह त्याच्या सात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला

डोंबिवली - मानपाडा पोलिसांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील शिरढोण गावालगतच्या जंगलात छापा टाकत गावठी हातभट्टी उध्वस्त केली असून अडीच हजार लिटर गावठी हातभट्टी दारू, दारू बनवण्याचे साहित्य , मोबाईल असा सुमारे ८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मानपडा पोलिसांनी विष्णू पाटील याच्या सह त्याच्या सात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूर्वेतील खोणीजवळ असलेल्या शिरढोण गाव येथील जंगलात नाल्याच्या बाजूला हातभटटी लावून त्यावर दारु गाळत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यात अडीच हजार लिटर गावठी हातभट्टी दारू, दारू बनवण्याचे साहित्य, मोबाईल असा सुमारे ८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी विष्णू पाटील याच्या सह त्याच्या सात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत आजमितीपर्यंत पोलिसांनी ३३ तडीपार प्रस्तावामध्ये ४२ जणांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आर्मअ‍ॅक्ट ३ नुसार ३ गावठी कट्टे आणि इतर ३७ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. भरारी पथकामार्फत ४ गुन्हे दाखल करत सुमारे १० लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच, दारूबंदीचे ११८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Twenty two thousand liters of barley liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.