तीन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:22 PM2019-02-12T19:22:10+5:302019-02-12T19:23:00+5:30

अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची सोलापूर ग्रामीण येथून पोलीस उपायुक्‍त म्हणून नाशिक शहरात आणि अतुल झेंडे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य येथून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

Transfers of three Superintendents of Police | तीन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

तीन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

Next

मुंबई - राज्य गृह विभागाने आज 3 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची सोलापूर ग्रामीण येथून पोलीस उपायुक्‍त म्हणून नाशिक शहरात आणि अतुल झेंडे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य येथून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. सध्या नाशिक आयुक्‍तालयात कार्यरत असलेले उपायुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.

Web Title: Transfers of three Superintendents of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.