उल्हासनगरात 4 लाखांचा तंबाखू पान मसाला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:38 PM2019-04-12T18:38:01+5:302019-04-12T18:40:47+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Tobacco pan masala worth 4 lakh seized in Ulhasnagar | उल्हासनगरात 4 लाखांचा तंबाखू पान मसाला जप्त

उल्हासनगरात 4 लाखांचा तंबाखू पान मसाला जप्त

ठळक मुद्दे4 लाख 40 हजार रुपयांचा साठा जप्त केला. शहरात यापूर्वी असा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे.

उल्हासनगर  - शहरातील चोपडा कोर्ट परिसरातील एका दुकानात तब्बल 4 लाख किमतीचा विमल पान मसाला  व तंबाखू पॉकेट अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे.  याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-4 चोपडा कोर्ट परिसरातील एका दुकानात तंबाखूजन्य विमल पान मसाला विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग ठाणे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागाचे आयुक्त इंद्रजीत चिलवंते यांच्या पथकाने 11 एप्रिल रोजी धाड टाकून विक्रीस प्रतिबंध असलेला  3 लाख 96 हजाराचा विमल पान मसाला पॉकेट व 44 हजाराचे तंबाखू पॉकेट असे एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी महेंद्र सोमय्या यांना अटक केली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरात यापूर्वी असा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे.

Web Title: Tobacco pan masala worth 4 lakh seized in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.