अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:14 PM2019-06-06T20:14:37+5:302019-06-06T20:17:12+5:30

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर ...

Three people were seriously injured in the accident and two seriously injured | अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देरविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद राशीद याची भरधाव वेगातील मोटारसायकल श्रीराम नगर नाक्यावरील सागर इंटरप्रायाजेस मारबल या दुकानासमोरील दुभाजकावर धडकली. पोलिसांनी अपघाताप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनीअपघाताप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेकडील पांचाळ नगर परिसरातील न्यू एकता सोसायटीच्या सदनिका नंबर 3 मध्ये राहणारा सुहास गुरुरीज राव (23) हा तरुण रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपली गाडी (क्रमांक एम एच 48 ए एस 7996) नवापूर येथून अथलिक रिसॉर्टच्या बाजूने राजोडी येथील बिमलेवाडी येथे पोहचताच सुहास याचे गाडीवरील नियंत्रण बिघडले आणि एका झाडावर गाडी आदळली. घटनास्थळीच सुहासचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला मित्र शुभम अहिरे हा गंभीर जखमी झाला आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे. तर दुसऱ्या घटनेत नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथील गरीब नवाज परिसरातील फुरकान चाळीत राहणारा अल्पवयीन 15 वर्षीय मोहम्मद राशिद फतेमोहम्मद खान हा मोटार सायकल (क्रमांक एम एच 48 डी डी 7654) घेऊन आणि पाठीमागे इरफान खान या मित्राला बसवून भरधाव वेगाने जात होता. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद राशीद याची भरधाव वेगातील मोटारसायकल श्रीराम नगर नाक्यावरील सागर इंटरप्रायाजेस मारबल या दुकानासमोरील दुभाजकावर धडकली. यात मोहम्मद राशीद याचा जागेवर मृत्यू झाला असून इरफान गंभीर जखमी झाला आहे. तुळींज पोलिसांनी अपघातात मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मनवेल पाडा परिसरात राहणारे संतोष रामनाथ जयस्वाल (52) यांचा चंदनसार रोडवरील तांदूळ बाजार परिसरात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.

Web Title: Three people were seriously injured in the accident and two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.