मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तिघांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 03:18 PM2019-04-20T15:18:06+5:302019-04-20T15:19:55+5:30

शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भारती विद्याापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Three people arrested for thief who theft vehicles for fun | मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तिघांना अटक  

मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तिघांना अटक  

Next

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भारती विद्याापीठ पोलिसांकडूनअटक करण्यात आली. चोरट्यांकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जीवन बाजीराव खेडेकर (वय २१) आणि अनुज रोहिदास भंडलकर (वय १९, दोघे रा. गुऱ्होळी  ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत. सिंहगड रस्ता, भारती विद्याापीठ, बिबवेवाडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. कात्रज येथील पुलाजवळ दोन संशयित चोरटे थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गुरव आणि प्रणव सकपाळ यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत खेडेकर आणि भंडलकर यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
 पुणे शहर तसेच सासवड परिसरातून दोघांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची माहिती तपासात मिळाली. त्यांच्याकडून तेरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, हडपसर भागातून दुचाकी चोरणाऱ्या सचिन चांगदेव निकम (वय ४२,रा. भेकराईनगर, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली. 
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, जगदीश गायकवाड आदींनी  केली.

Web Title: Three people arrested for thief who theft vehicles for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.