नागरिकांना लुबाडणाऱ्या ३ तोतया पोलिसांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:20 PM2019-04-12T20:20:48+5:302019-04-12T20:22:37+5:30

या तिघांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Three fake cops arrested by bhoiwada police | नागरिकांना लुबाडणाऱ्या ३ तोतया पोलिसांना बेड्या 

नागरिकांना लुबाडणाऱ्या ३ तोतया पोलिसांना बेड्या 

Next
ठळक मुद्देसोमवारी कामत रुग्णालय परिसरात वावरत असताना राकेश रत्नाकर शेजवळ, चंद्रकांत रामा गोलार, मिथुन संतोश चव्हाण या तिघांनी त्यांना गाठले. एका आरोपीने आर.एम.भट्ट हायस्कूलच्या गल्लीतील एटीएममधून ३० हजार रुपयेे काढूूून एटीएम कार्ड पुन्हा कामत यांच्याजवळ देेऊन पळ काढला. 

मुंबई - पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या तीन भामट्यांना भोईवाडा पोलिसांनीअटक केली आहे. राकेश रत्नाकर शेजवळ (२७), चंद्रकांत रामा गोलार (३४), मिथुन संतोष चव्हाण (२८) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मूळचे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे राहणारे बिन्देस्वर कामत (६५) हे टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आले आहेत.  मुंबईत कुणीही नातेवाईक नसल्यामुळे रुग्णालयाबाहेरील पदपथावर ते पत्नीसोबत राहतात. सोमवारी कामत रुग्णालय परिसरात वावरत असताना राकेश रत्नाकर शेजवळ, चंद्रकांत रामा गोलार, मिथुन संतोश चव्हाण या तिघांनी त्यांना गाठले.  तिघांनी कामत यांना पोलीस असल्याची बतावणी करून गुन्ह्यात आत टाकण्याची धमकी दिली. तसेच अटक न व्हावी यासाठी दंड म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितली. हातात पैसे नसल्यामुळे कामत यांनी घाबरून एटीएम कार्ड आरोपींकडे देत, त्यांना पीन नंबरही दिला. त्यानंतर एका आरोपीने आर.एम.भट्ट हायस्कूलच्या गल्लीतील एटीएममधून ३० हजार रुपयेे काढूूून एटीएम कार्ड पुन्हा कामत यांच्याजवळ देेऊन पळ काढला. 

घडलेल्या प्रकाराची माहिती कामत यांनी त्यांच्या पत्नीला दिली. मात्र, पोलीस कारवाई करतात तर त्याचा काहीतरी पेपर  देतात. कामत यांना फसवण्यात आल्याचं तिच्या लक्षात आल्यानंतर तिने कामत यांना घेऊन पोलीस ठाणे गाठत तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान मंगळवारी हे तिघे पुन्हा कुठल्यातरी वृद्ध आजारी माणसाला लक्ष्य करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडले. या तिघांकडून पोलिसांनी फसवणुकीचे ३० हजार रुपये हस्तगत केले आहेत. 

Web Title: Three fake cops arrested by bhoiwada police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.