ठाण्यात अमली पदार्थ विरोध जनजागृती अभियानाचा सांगता सोहळा संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:26 PM2018-12-21T21:26:11+5:302018-12-21T21:28:33+5:30

हे अभियान फक्त शाळा कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वत्र राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात अमली पदार्थविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्षक, विध्यार्थी यांचे त्यांनी आभार मानले.

Thanjavat Amali Mantra Pratibha Janjagruti campaign concluded | ठाण्यात अमली पदार्थ विरोध जनजागृती अभियानाचा सांगता सोहळा संपन्न 

ठाण्यात अमली पदार्थ विरोध जनजागृती अभियानाचा सांगता सोहळा संपन्न 

Next
ठळक मुद्दे हे अभियान फक्त शाळा कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वत्र राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आलं होतं विशेष मेहनत घेतली त्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा  विशेष मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

मुंबई - ठाणे पोलीस विभागाकडून 14  डिसेंबर सुरु केलेल्या नो ड्रग्स कँम्पीयनचा सांगता समारंभ आज 21 डिसेंबरला   टीप टॉप प्लाझा येथे पार पडला.  पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या सगळ्या प्राध्यापक आणि शिक्षकांचे आभार मानले.  हे अभियान फक्त शाळा कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वत्र राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात अमली पदार्थविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्षक, विध्यार्थी यांचे त्यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाकरिता ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा  विशेष मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये या अभियानादरम्यान ज्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतून विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, केशव पाटील, प्रवीण पवार आणि पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे हे पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. 

Web Title: Thanjavat Amali Mantra Pratibha Janjagruti campaign concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.