टँकर-कार-बसचा तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:28 PM2018-12-09T22:28:41+5:302018-12-09T22:29:09+5:30

दोंडाईचा : विखरण गावानजीकची घटना, एक महिला जखमी

Tanker car bus triple accident | टँकर-कार-बसचा तिहेरी अपघात

टँकर-कार-बसचा तिहेरी अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा- धुळे रस्त्यावर  विखरण गावालगत लक्ष्मी हॉटेलनजिक  कारला  पाण्याचा टँकरने मागून धडक दिली. या धडकेमुळे कार पुढील बसवर जाऊन धडकली. या अपघातात एक महिला जखमी झाल्याची घटना  रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
दोंडाईचा  येथील  सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.दिलीप पाटील यांच्या आई  सुमनबाई जुगराज पाटील (वय ६१) व जुगराज बारकु पाटील हे धुळे येथे  एम.एच.१८ ए.जे. २२४४ क्रमांकाच्या कारने काही कामानिमित्त जात होते. कारचा चालक विजय कोळी दोंडाईचा-धुळे रस्त्यावरील विखरण गावालगत कारचे ब्रेक दाबल्याने मागून येणारा पाण्याचा टँकर कारवर धडकला. त्याचवेळी कारला मागून धडक बसल्याने कार समोरुन जाणाºया एम.एच.२० बी.एल. २६६६ क्रमांकाच्या बसवर जाऊन धडकली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून सुमनबाई पाटील यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु होते.

Web Title: Tanker car bus triple accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे