शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 08:32 PM2018-12-13T20:32:10+5:302018-12-13T20:37:00+5:30

गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत गाढवदरा येथे गाडी आली असता, मोटारसायकलवरून चार जण आले आणि त्यांनी पवार यांच्या या गाडीवर तुफान दगडफेक केली

stone-pelting on Farmers' Association's State President Vitthal Pawar's four wheeler | शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक 

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक 

googlenewsNext
ठळक मुद्देअंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर फरार

शिरूर  : गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे.
 या संदर्भात माहिती अशी की, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी कै. शरद जोशी यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद आटपून शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उसदर नियामक मंडळाचे सदस्य शिवानंद दरेकर व कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख हिरामण बांदल हे निमोणेहुन शिरूरकडे निघाले होते.
गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत ७.३०च्या दरम्यान गाढवदरा येथे गाडी आली असता, पाठीमागुन दोन मोटारसायकलवरून चार जण आले आणि त्यांनी पवार यांच्या या गाडीवर तुफान दगडफेक केली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळुन गेले. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या असुन मागे बसलेले शिवानंद दरेकर यांना मुका मार लागला आहे. या घटनेनंतर पवार यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फोन केला असता शिरूर पो. स्टे. चे पी.आय.कैलासराव घोडके, अतिरिक्त पी.आय. मुंडे हे आपल्या सहका-यासोबत त्वरीत घडनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाहुन गाडीच्या फुटलेल्या काचा व काही दगड हस्तगत केले आहे. या घटनेची शिरूर पो. स्टे. ला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 

Web Title: stone-pelting on Farmers' Association's State President Vitthal Pawar's four wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.