अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडला गुन्हा, मुलगा आणि पुतण्याने गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:29 AM2019-02-09T02:29:00+5:302019-02-09T02:29:13+5:30

पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गटारात १५ दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकलेला पोलिसांना आढळला होता.

son and nephew murdered the woman | अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडला गुन्हा, मुलगा आणि पुतण्याने गळा दाबून केला खून

अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडला गुन्हा, मुलगा आणि पुतण्याने गळा दाबून केला खून

Next

नालासोपारा - पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गटारात १५ दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकलेला पोलिसांना आढळला होता. या महिलेच्या हत्येप्रकरणी पती, सख्या मुलासह पुतण्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या मृतदेहावर असलेल्या कागदाच्या तुकडयावरून या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपी पती राम मिलन प्रजापती (४०), मुलगा महेश आणि पुतण्या महेंद्र उर्फ सूरज प्रजापती यांना अटक केले असून पुढील तपास करत आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या गोगटे गणेश मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गटारात २१ जानेवारीला अज्ञात महिलेची हत्या करून फेकलेला मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरु वात केली. कोणताही पुरावा आणि कोणतेही धागेदोरे नसताना ३ टीम वेगवेगळ्या शहरात तपास करीत होत्या. महिलेच्या मृतदेहाच्या कपड्यात कागदाचा तुकडा सापडला होता. या तुकड्यामधील दोन मोबाईल नंबरावरून या तिची ओळख पटवूत हत्येचा उलगडा झाला आहे. कुसुम राम मिलन प्रजापती (३८) असे तिचे नाव आहे.
ही हत्या एक रूम आणि चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचे उघड झाले आहे. पती राम मिलन प्रजापती (४०) यांच्यासोबत तिचे लग्न झाले होते. परंतु ती पती आणि ४ मुलांपासून गेल्या २ वर्षांपासून जटाशंकर चाळ, हवाईपाडा, संतोष भवन येथे एकटी राहत होती. ती साकीनाका येथील गारमेंट्स फॅक्टरीत काम करीत होती. पुढील तपास सुरू आहे.

असा आखला कट

राम मिलन याने हा रूम मीरा रोड मधील एकाला विकला होता पण कुसुम या रूमवरील कब्जा सोडत नव्हती. तसेच ती वेगळी राहत असल्यामुळे तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ही रूम परत मिळवण्यासाठी तिघांनी मिळून तिचा काटा काढण्यासाठी प्लॅन आखून तिचा खून केला.

Web Title: son and nephew murdered the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.