पैशासाठी मित्रच चोर बनला...मिकाच्या घरी मित्रानेच केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 02:42 PM2018-08-02T14:42:39+5:302018-08-02T14:43:29+5:30

दिल्ली पोलिसांनी केली अटक आणि ओशिवरा पोलिसांकडे केले सुपूर्द 

Singer Mika Singh friend steal money from mikas house | पैशासाठी मित्रच चोर बनला...मिकाच्या घरी मित्रानेच केली चोरी

पैशासाठी मित्रच चोर बनला...मिकाच्या घरी मित्रानेच केली चोरी

Next

मुंबई - लोकप्रिय गायक मिका सिंगच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी त्याचा मित्र अंकित वासन याला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून ओशिवरा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली. आरोपी मित्राने मिकाच्या घरून २ लाखांचे दागिने आणि १ लाखांची रोख रक्कम लंपास केली होती.  शनिवारी चोरी झाल्यानंतर अंकित फरार झाला होता. मिकाच्या घरात चोरी झाल्याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती. अखेर दिल्लीत त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

२७ वर्षीय अंकित वासन मिकाचे कॉन्सर्ट आयोजनाचे काम करायचा. पंधरा वर्षांपासून मिका आणि अंकित एकामेकांचे चांगले मित्र आहेत. अंकित मिकाच्या अंधेरीतील स्टुडिओ जवळच राहायचा. अंकित अनेकदा मिकाच्या घरी येत जात असे. त्यामुळे इमारतीचा चौकीदारही त्याला कधी हटकत नव्हते. अंकित अनेकदा मिकाच्या घरातील लहान-सहान गोष्टी चोरत असे. मात्र, शनिवारी ३ लाख रुपये किंमतीच सामान आणि काही रोकड गायब असल्याचं मिकाच्या लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी अंकितकडून ५० हजार रुपयांची रोकड आणि स्टुडिओच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नावानं असलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये जमा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

Web Title: Singer Mika Singh friend steal money from mikas house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.