धक्कादायक! माहीम परिसरात चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:05 PM2019-02-07T19:05:29+5:302019-02-07T19:05:57+5:30

याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 

Shocking kid sexual assassination murdered in Mahim area | धक्कादायक! माहीम परिसरात चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या 

धक्कादायक! माहीम परिसरात चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या 

Next

मुंबई - माहीम परिसरातील एल जे. रोडवर काल मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रस्त्यावर आई - वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय मुलीला एका अज्ञात नराधमाने पळवून नेले. तिचे लैंगिक शोषण करून तिचा हत्या करून पळ काढला. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात अपहरण, पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. आज सकाळी पोलीस नियंत्रण कक्षास माहीम परिसरात चिमुकल्या मुलीचा मृतदेह मिळाल्याबाबत कॉल प्राप्त झाला. त्यानंतर माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झालं. 

 पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, वेठबिगारीचं काम करून पोटाची खळगी भरणारं कुटुंब माहीम येथील एल जे. मार्ग येथील फूटपाथवर रात्रीच्या वेळेस झोपले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. ही घटना पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा याप्रकरणी आज दुपारपर्यंत तपास करत होते. नागपूर येथे राहणारं दाम्पत्य मुंबईत कामासाठी आलं. तीन मुली आणि एक मुलगा अशी या दाम्पत्याला मुलं आहे. मृत मुलीचे वडील अपंग असून ते रात्रौ रस्त्यावर झोपले असताना त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीला कोणीतरी पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात आरोपी मध्यरात्री ३ ते ४ वाजताच्या दरम्यान पाच वर्षाच्या मुलीला नेत असल्याचे दिसत आहे. 

Web Title: Shocking kid sexual assassination murdered in Mahim area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.