धक्कादायक! दारूच्या नशेत पोलिसाला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:57 PM2019-05-13T15:57:08+5:302019-05-13T16:01:45+5:30

विरार पोलिसांनी दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 

Shocking Drug drunk policeman | धक्कादायक! दारूच्या नशेत पोलिसाला धक्काबुक्की

धक्कादायक! दारूच्या नशेत पोलिसाला धक्काबुक्की

googlenewsNext
ठळक मुद्देबँक ऑफ बडोदा बँकेच्या समोरील बस स्टॉपवर तीन जण दारू पित असल्याचे दिसलेतरुणाने पोलीस शिपाईला धक्काबुक्की करून कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली

नालासोपारा - रात्री गस्तीला फिरत असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर दारूच्या नशेत धावून जात तरुणाने पोलीस शिपाईला धक्काबुक्की करून कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. विरारपोलिसांनी दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 

विरार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राकेश गौतम शिरसाट, पोलीस शिपाई कल्पेश किणी आणि वसई बिट मार्शल व पोलीस शिपाई एस के उगले हे विरार पूर्वेकडील मनवेलपाडा रस्त्यावर शनिवारी रात्रीची गस्त घालण्यासाठी निघाल्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ बडोदा बँकेच्या समोरील बस स्टॉपवर तीन जण दारू पित असल्याचे दिसले. त्यांना जाऊन विचारणा केल्यावर पोलिसांशी हुज्जत घालून दारूच्या नशेत धुंद असलेला राजेश राजू वने (25) हा पोलिसांच्या अंगावर धावत जाऊन राकेश शिरसाट यांना धक्काबुक्की करून त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. विरार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Shocking Drug drunk policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.