Shocking The deceased girl is dead; Dropped into the toilet given by the mother | धक्कादायक! जन्मलेली मुलगी मृत समजताच; आईने दिले शौचालयात टाकून
धक्कादायक! जन्मलेली मुलगी मृत समजताच; आईने दिले शौचालयात टाकून

ठळक मुद्देमृत बाळ शौचालयातच सोडून घरी पलायन केलेमहिलेचे नाव सुप्रिया सुर्यकांत कानेकर (वय १९) असं आहे.सार्वजनिक शौचालयात एका अर्भकाचा मृतदेह आढळल्याने आंबोली परिसरात खळबळ माजली

मुंबई - अंधेरी येथील आंबोली परिसरातील एका महिलेने शौचालयात मुलीला जन्म दिला. मात्र, जन्मलेली मुलगी मृत असल्याचे समजताच तिने ते मृत बाळ शौचालयातच सोडून घरी पलायन केले. या महिलेचे नाव सुप्रिया सुर्यकांत कानेकर (वय १९) असं आहे. या महिलेविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक शौचालयात एका अर्भकाचा मृतदेह आढळल्याने आंबोली परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी स्थानिकांनी परिसरातील गर्भवती महिलांची माहिती काढली असता पोलिसांना मृत अर्भकाची आई सापडली आहे. पोलिसांनी या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया कानेकर सोमवारी सार्वजनिक शौचलयात गेल्या असताना त्यांनी मुलीला जन्म दिला. मात्र जन्माला आलेली मुलं मृत असल्याचे लक्षात येताच कुणाला माहिती पडू नये म्हणून शौचालयातच या मृत मुलीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शौचालयात मृत बाळ बघितल्यानंतर परिसरातील स्थानिकांनी पोलिस स्थानकत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर मृत अर्भक शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. स्थानिकांनी गर्भवती महिलांची माहिती काढली. त्यामार्फत पोलीस कानेकरपर्यंत पोहोचले. कानेकरने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली. सध्या कानेकर रुग्णालयात दाखल असून ती बरी झाल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली.


Web Title: Shocking The deceased girl is dead; Dropped into the toilet given by the mother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.