The search for the accused for sexually exploiting girls | मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू
मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू

ठळक मुद्देआरोपी तरुणाच्या कृत्यामुळे मीरारोड परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. घरच्यांना घडला प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी घडलेल्या घटने प्रकरणात पोलीसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.

मीरारोड - अल्पवयीन मुलीस आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा नया नगर पोलीस शोध घेत आहेत. आरोपी तरुणाच्या कृत्यामुळे मीरारोड परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. 

नया नगर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी एक नऊ वर्षाची मुलगी इमारतीच्या आवारात खेळत असताना टोपी घालून आलेल्या तरुणाने तिच्याशी बोलायला सुरुवात केली. नंतर तो तिच्याशी अश्लीलपणाने बोलू लागला आणि आपले गुप्तांग तीला काढून दाखवले. या प्रकाराने घाबरून मुलगी घरी पळाली. घरच्यांना घडला प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

सोमवारी रात्री मीरारोड भागातीलच एका तरुणीला गाठून त्याने तसाच प्रकार केला. असला विकृत प्रकार करून आरोपी पळून जात असल्याने या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे. रविवारी घडलेल्या घटने प्रकरणात पोलीसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्याचे छायाचित्र पोलीसांनी व्हायरल केले असून ओळख पटल्यास पोलीसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. उपनिरीक्षक सोहेल पठाण व पथक तपास करत असून पालकांनी मुलींची काळजी घ्यावी असे पोलीसांनी सांगितले आहे.


Web Title: The search for the accused for sexually exploiting girls
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.