सव्वा कोटीची फसवणूक : लाचखोर मंडळ अधिकारी... हाजीर हो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:55 AM2019-03-19T03:55:08+5:302019-03-19T03:55:24+5:30

१ कोटी २० लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मागील महिन्यात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Savitri crores fraud: Bribery Board official ... Hazare Ho! | सव्वा कोटीची फसवणूक : लाचखोर मंडळ अधिकारी... हाजीर हो!

सव्वा कोटीची फसवणूक : लाचखोर मंडळ अधिकारी... हाजीर हो!

Next

वसई : वसई तहसीलदार कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपण वसईचे तहसीलदार असल्याचे सांगून मुंबईच्या व्यावसायिकांना जमीन देण्याच्या बहाण्याने निलंबित व लाचखोर तलासरी तहसीलचा झरी मंडळ अधिकारी सुनील पोपट राठोड (४२) याने १ कोटी २० लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मागील महिन्यात वसई पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होताच आरोपी सुनील राठोड हा फरार झाला असून त्याच्या शोधात वसई पोलीस असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक पुकळे यांनी दिली आहे.
मुंबई- दहिसर येथील दोघा व्यावसायिकांना आपण वसईत तहसीलदार असल्याचे सांगून जमीन देतो असे आमिष देऊन राठोड याने त्यांच्याकडून सहा वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २० लाख रु पये उकळले होते.
२०१३ मध्ये वसईत पुरवठा निरीक्षक पदावर राठोड हा कार्यरत असताना फिर्यादी अभिषेक रामसिंग हांडा व भागीदार इम्रान पटेल या दोघा व्यावसायिकाकडून राठोड याने एकूण सव्वा कोटीची भली मोठी रक्कम उकळली होती. त्यातच दोघांपैकी एक भागीदार इम्रान पटेल यांचा सन २०१५ मध्ये मृत्यू झाल्यावर हांडा या व्यावसायिकाने राठोड याच्याकडे आपले पैसे किंवा जमिन परत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता.
दरम्यानच्या काळात सुनील राठोड याची तलासरी तालुक्यात झरी मंडळ अधिकारी म्हणून बदली देखील झाली. मात्र, त्या ठिकाणी तक्र ारदराने पाठपुरावा सुरु च ठेवला होता. आपले पैसे किंवा बदल्यात जमिन काही परत मिळत नाही हे लक्षात आल्यावर अखेर या व्यावसायिकाने वसई पोलिस ठाण्यात धाव घेत राठोड याच्या विरु द्ध फसवणुकीची तक्र ार दाखल केली,
या प्रकरणी वसई पोलिसांनी आरोपी सुनील पोपट राठोड याच्या विरु द्ध भा.दंड.संहिता कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
एका जबाबदार पदावरील महसूल अधिकाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याने पालघर जिल्हा महसूल प्रशासनाचे तीन तेरा वाजवले आहेत.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला !
वसई पोलिसांच्या सांगण्यानुसार, हा फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच राठोड याने आपल्या मुंबईच्या राहत्या व चाळीसगावच्या घरातून देखील पळ काढला आहे. त्याच दरम्यानच्या काळात राठोड याने अटक पूर्व जामिनासाठी वसई कोर्टात अर्ज देखील केला होता.
मात्र, वसई पोलिसांनी हा डाव उधळून लावला. याउलट मधल्या काळात बदल्या, आचारसंहिता, बंदोबस्त या सर्व घडामोडीत आरोपी सुनील राठोड आता कुठंही सापडत नव्हता तर त्याचा सर्व ठिकाणी शोध सुरु असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पुकळे यांनी सांगितले.

Web Title:  Savitri crores fraud: Bribery Board official ... Hazare Ho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.