सलमान खानची कोरियोग्राफर चालवत होती सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:24 PM2018-11-20T21:24:09+5:302018-11-20T21:25:29+5:30

डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते. अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात पाठविले होते.

Salman Khan's choreographer was running a sex racket | सलमान खानची कोरियोग्राफर चालवत होती सेक्स रॅकेट

सलमान खानची कोरियोग्राफर चालवत होती सेक्स रॅकेट

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला कोरियोग्राफरचे अॅग्नेस हेमिल्‍टन (वय 56) असं नावं आहे. ही महिला आरोपी तरुणींना खाडी आणि आफ्रिकन देशात सप्लाय करत होतीआरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालविते. डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते ‍ती मागणीनुसार मुंबईहून तरुणींना पाठवत होती. अॅग्नेेसने एका तरुणीला कंसर्टसाठी केनियामध्ये पाठविले होते.

मुंबई - डान्स शिकविण्याच्या नावाखाली मॉडल आणि स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला शरीरविक्रीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिला कोरियोग्राफरला अटक केली आहे. या महिला कोरियोग्राफरचे अॅग्नेस हेमिल्‍टन (वय 56) असं नावं आहे. ही महिला आरोपी तरुणींना खाडी आणि आफ्रिकन देशात सप्लाय करत होती, असाही आरोप अटक करण्‍यात आलेल्या महिलेवर करण्‍यात आला आहे. आरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालविते. डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते. अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात पाठविले होते. तेथे त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले होते. पोलिसांनी आरोपी महिलेकडून अनेक आक्षेपार्ह क्लिप आणि दस्ताऐवजही जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक अभिनेत्याला आणि अॅक्ट्रेसेसला डान्स शिकविल्याचा दावा अॅग्नेस हेमिल्टनने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. अॅग्नेस हिने प्रभुदेवा आणि गणेश आचार्यला असिस्ट केले होते. अभिनेत्री डेजी शाह हिला देखील डान्स शिकविल्याचे अॅग्नेसने पोलीस चौकशीत सांगितले आहे. अॅग्नेस ही भारत आणि मलेशियादरम्यान अधूनमधून प्रवास करते. तिथे ती विदेशी नागरिकांच्या गाठीभेटी घेते. नंतर ‍ती मागणीनुसार मुंबईहून तरुणींना पाठवत होती. अॅग्नेेसने एका तरुणीला कंसर्टसाठी केनियामध्ये पाठविले होते. ती तरुणी केनियात पोहोचल्यानंतर ‍तेथील एका महिलेने तिला नैरोबीमध्ये घेऊन गेली आणि तिला शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करण्‍याचा प्रयत्न केले. मात्र त्या तरुणीने शरीरविक्रीस विरोध केल्याने तिला अमली पदार्थाच्या प्रकरणात ओढण्यात आले. 

Web Title: Salman Khan's choreographer was running a sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.