बिल्डर समीर भोजवानीच्या अटकपूर्व जामिनाविरोधात इओडब्ल्यूने केले हायकोर्टात अपील दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:20 PM2018-12-19T21:20:49+5:302018-12-19T21:21:23+5:30

याची दखल घेत इओडब्ल्यूने उच्च न्यायालयात या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्यात आलं असून या आव्हान याचिकेवर ७ जानेवारी २०१९ साली सुनावणी ठेवण्यात आली आहे. 

Saira Banu complaint case: EOW filed an appeal in the High Court against builder Sameer Bhojwani's anticipatory bail | बिल्डर समीर भोजवानीच्या अटकपूर्व जामिनाविरोधात इओडब्ल्यूने केले हायकोर्टात अपील दाखल  

बिल्डर समीर भोजवानीच्या अटकपूर्व जामिनाविरोधात इओडब्ल्यूने केले हायकोर्टात अपील दाखल  

googlenewsNext

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या तक्रारीनंतर बिल्डर समीर भोजवानीच्या विरोधात २०१७ साली खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्रे बनवून बांद्रा येथील जागा हडपण्याचा प्रयत्न या बिल्डराने केला असल्याचा आरोप सायरा बानो यांनी पोलिसांकडे केला होता. त्यानंतर २०१८ साली आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सत्र न्यायालयाने भोजवानीला अटकपूर्व जामीन १२ एप्रिल २०१८ साली सुनावणीअंती मंजूर केला. त्यानंतर याप्रकरणी सायरा बानो यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायरा बानो यांनी भेट घेतली. त्यानंतर इओडब्ल्यूला मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत इओडब्ल्यूने उच्च न्यायालयात या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्यात आलं असून या आव्हान याचिकेवर ७ जानेवारी २०१९ साली सुनावणी ठेवण्यात आली आहे. 

Web Title: Saira Banu complaint case: EOW filed an appeal in the High Court against builder Sameer Bhojwani's anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.