आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना जीवरक्षकांनी वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:05 PM2018-09-21T18:05:27+5:302018-09-21T18:05:52+5:30

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली

Rescued survivors of three children drowning on Axa Beach | आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना जीवरक्षकांनी वाचविले 

आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना जीवरक्षकांनी वाचविले 

मुंबई -  मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ख्याती असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर आज दुपारी 2 वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली. मात्र, येथील खड्यात ती सापडून बुडत असल्याचे येथे पाहरा देणारे जीवरक्षक मालाड आक्सा बीचवरील मुंबई अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमचे स्वतेज कोळंबकर व जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी आणि निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी चपळाईने पाण्यात उड्या मारून या तीन मुलांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले. या तीन मुलांना वाचविल्याबद्धल त्यांनी येथील जीवरक्षकांचे आभार मानले.

Web Title: Rescued survivors of three children drowning on Axa Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.