लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:41 AM2019-05-07T00:41:22+5:302019-05-07T00:41:36+5:30

चतु:श्रृंगी पोलिसांकडे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार ८ फेबु्रवारी रोजी दाखल होती.  या मुलीला पळवून नेताना त्याने काहीही मागमूस ठेवला नव्हता.

Rescued minor girl concealed in the forest of Lavasa | लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Next

पुणे - चतु:श्रृंगी पोलिसांकडे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार ८ फेबु्रवारी रोजी दाखल होती.  या मुलीला पळवून नेताना त्याने काहीही मागमूस ठेवला नव्हता. तब्बल तीन महिन्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाला एक छोटासा धागा मिळाला. त्यावरुन पोलिसांनी लवासाच्या पलीकडे डोंगरात लपून बसलेल्या या दोघांचा शोध घेऊन मुलीची सुटका केली.

आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते. तो मोबाईलही वापरत नव्हता. तसेच कोणत्याही नातेवाईकाशी त्याने संपर्क साधला नव्हता. त्यामुळे काहीही कळायला मार्ग नव्हता. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक किरण अब्दागिरे यांना एक छोटासा धागा मिळाला. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर मुलगी व आरोपी हे मुळशी तालुक्यातील तव या गावी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. 

सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, हवालदार रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदीप गायकवाड आणि किरण अब्दागिरे हे पथक लवासाच्या पाठीमागील डोंगरात शोध घेऊ लागले. या जंगलात काहीही माहित नसताना व हिंस्त्र प्राण्याची तमा न बाळगता ते तव गावाजवळच्या डोंगरावर शोध घेत राहिले. तेव्हा त्यांना एक झोपडी दिसून आली. त्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर या झोपडीत ही मुलगी होती. आरोपीने आपल्या लांबच्या आजी, आजोबाबरोबर तिला ठेवले होते. त्याने दररोज लागणारे धान्य व अन्य साहित्य अगोदरच आणून ठेवले होते. पोलिसांनी त्याला चतु:श्रृंगी पोलिसांच्या हवाली करुन मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Web Title: Rescued minor girl concealed in the forest of Lavasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.