जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:24 PM2018-12-26T20:24:46+5:302018-12-26T20:27:08+5:30

१९ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Raid on gambling stand; 15 lakh worth of money seized | जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्दे दुचाकी, चार चाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़.पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला

 

रेणापूर (जि़ लातूर) : तिर्रट नावाचा जुगार सुरु असलेल्या पिंपळफाटा (रेणापूर) येथील ठिकाणावर पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री  धाड टाकली़ यावेळी रोख ८१ हजार ४०० रुपयांसह दुचाकी, चारचाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी १९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोउपनि महेश गळगटे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री धाड टाकण्यात आली़ यावेळी पोलिसांनी रोख ८१ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले. तसेच दुचाकी, चार चाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. 
यावेळी पोलिसांनी शिवाजी आलापूरे (रा. बिटरगाव), परमेश्वर चव्हाण (रा. रूपचंद नगर, रेणापूर), सचिन हेरे, अतुल शिंदे, श्रीमंत आघाव, जयद्र आपटे (रा. अंबाजोगाई), बाळू चव्हाण (रा. पिंपळफाटा), गोविंद तरडे, विठ्ठल राठोड, गोविंद राठोड, बळीराम कुरे, दिलीप व्यवहारे (रा़ रेणापूर), गुलाबचंद जस्वाल (रा. नागाव ता. भिवंडी), लहुदास राठोड (रा. वन टाकळी ता. परळी), बालासाहेब मुंडे (रा. सोनहिवरा ता. परळी), तानाजी आलापुरे (रा. बिटरगाव), सुनील आडे (नेहरूनगर तांडा), रमाकांत गाडवे, कबीर तांबोळी (रा. पंढरपूर) अशा १९ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Raid on gambling stand; 15 lakh worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.