Breaking अखेर फरार नीरव मोदीला ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:00 PM2019-03-20T15:00:41+5:302019-03-20T15:03:15+5:30

भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे.  

Punjab National Bank Scam Update: Nirav Modi Arrested In London | Breaking अखेर फरार नीरव मोदीला ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये अटक

Breaking अखेर फरार नीरव मोदीला ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये अटक

Next
ठळक मुद्देलंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते. विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते

लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीविरोधात लंडनच्यान्यायालयाने नुकतेच अटकपूर्व वॉरंट जारी केले होते. त्यामुळे नीरव मोदीला बेड्या ठोकणं सोपं झालं. तर, भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे. नीरव मोदीला स्थानिक वेळेनुसार ११.२० वाजता लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात हजर केले जाणार आहे. 

नीरव मोदीविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने जुलै- ऑगस्टमध्ये नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली होती.

नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी




 

Web Title: Punjab National Bank Scam Update: Nirav Modi Arrested In London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.