शहरातील वाहनचोरांवर कारवाई करण्यात पुणे पोलीस ठरले ‘उणे ’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:42 PM2019-02-23T12:42:34+5:302019-02-23T12:52:18+5:30

२०१७ मध्ये शहरातून एकुण मिळून २२१२ वाहने चोरीला गेली होती. २०१८ मध्ये एकुण मिळून १९६६ वाहने चोरीला गेली आहेत.

Pune Police less into take action against vehicles theft in the city | शहरातील वाहनचोरांवर कारवाई करण्यात पुणे पोलीस ठरले ‘उणे ’

शहरातील वाहनचोरांवर कारवाई करण्यात पुणे पोलीस ठरले ‘उणे ’

Next
ठळक मुद्देमागील वर्षी 1757 दुचाकी चोरीला :  गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी : डॉ. के. वेंकटेशम

पुणे : शहरात शांतता सुव्यवस्था ठेवावी याकरिता पोलीस प्रशासनाने डिजिटालाईज होण्याचा निर्धार केला असताना दुस-या बाजुला अद्याप वाहतूक विभागाला वाहन चोरीला आळा घालण्यात अपयश आले आहे. दिवसाला सरासरी सहा ते सात वाहनांची चोरी होत असून गेल्या वर्षी शहर परिसरातून 1757 दुचाकी चोरीला गेली. तर 59 तीन चाकी आणि 150 चारचाकी वाहनांची चोरी झाली आहे. मात्र, हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने ते वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 
  २०१७ मध्ये शहरातून एकुण मिळून २२१२ वाहने चोरीला गेली होती. २०१८ मध्ये एकुण मिळून १९६६ वाहने चोरीला गेली आहेत. वाहन चोरीचे गुन्हे कमी झाले असले तरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण केवळ २९ टक्के एवढे आहे. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेतील सर्व पथके तसेच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.  वाहनचोरीचे  गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची कबुली  डॉ. के. वेंकटेशम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वाहन चोरी रोखण्यासाठी ज्या भागातून वाहने चोरीला जातात. अशा  भागांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 
दुसरीकडे  वाहतूक शाखेसाठी सीसीटीव्ही आणी ईचलन डिव्हाई मशीन्सचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. याव्दारे वाहतूक शाखेला कोट्यावधी रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल केले आहेत. वाहतूक शाखेने 2018 मध्ये सीसीटीव्हीव्दारे नियमभंग करणा-या 6 लाख 33 हजार 424 जणांवर कारवाई केली . त्यापैकी 87 हजार 637 केसेसमध्ये 1 कोटी 85 लाख 89 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ई-चलनव्दारे 12 लाख 14 हजार 500 जणांवर कारवाई करुन त्यापैकी 7 लाख 24 हजार 494 जणांकडून 17 कोटी 51 लाख 15 हजार 242 रुपये दंड वसुल करण्यात आला. 
 
* वाहतूक नियमभंग करणा-यांवर सीसीटीव्हीव्दारे करण्यात आलेली कारवाई : 
वर्ष    केसेसची संख्या  आकारण्यात आलेला दंड   पैकी किती केसेसमधून   आकारण्यात आलेल्या दंडापैकी जमा रक्कम
2018  6,33,424           13,79,13,900                   87,637                           1,85,89,700 
2017  4,51,478            10,90,32,400                 48,479                             1,10,80,100 

ई-चलन डिव्हाईस चलनव्दारे कारवाई 
वर्ष     केसेसची संख्या  आकारण्यात आलेला दंड     पैकी किती केसेसमध्ये                      दंडाची जमा रक्कम 
2018  12.14.500    32,66,14,397             7,24,494                                       17,51,15,242 
2017   8,39,609    21,34,55,028           5,67,344                                          12,70,88,345

Web Title: Pune Police less into take action against vehicles theft in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.