पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

By पूनम अपराज | Published: August 20, 2018 04:51 PM2018-08-20T16:51:57+5:302018-08-20T17:17:38+5:30

फरार आरोपी असलेल्या अविनाशच्या मित्राला पकडण्यासाठी पोलीसांची तयारी 

The police's informer and key witness of major cases has murdere in MIDC | पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

googlenewsNext

मुंबई -  २०११ सालच्या आंबोली येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य साक्षीदार असलेल्या अविनाश सोलंकी उर्फ बालीचा (वय - ३८)  मृतदेह अंधेरी पूर्वेतील महाकाली केव्ह्ज रोडवरील अपोलो इंडस्ट्रिअल इस्टेटमधील गाळा क्रमांक ३४ मध्ये  सापडला आहे. अविनाश हा पोलिसांचा गेल्या २० वर्षांपासून अत्यंत महत्वाचा खबरी होता. त्याच्या डोक्यावर, पोटावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूने प्रहार केल्याचे अविनाशच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून दिसून येत होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून फरार दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अविनाशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

आंबोली येथे २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते आणि शहरात एकाच खळबळ माजली होती. या दुहेरी हत्याकांडात अविनाश हा मुख्य साक्षीदार होता. त्याने या प्रकरणात शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच या प्रकरणातल्या चार आरोपींना २०१६ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली. ही हत्या चार जणांनी केली होती. जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक तिवल अशी या चौघांची नावे होती. या चौघांनी किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांनाही चाकू हल्ला करून ठार केले होते. या दोघांवरही अनेक वार करण्यात आले होते. हे दोघेही गंभीर जखमी असताना त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. किनानचा मृत्यू या घटनेनंतर रूग्णालयात दाखल करतानाच झाला, तर रियुबनचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेताना काही दिवसांनी झाला. या प्रकरणात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता. तसेच २००९ साली झालेल्या दिवंगत चकमक फेम विजय साळसकर यांचा खबरी इरफान मकबूल हसन खान उर्फ इरफान चिंदी याच्या खूनप्रकरणी देखील अविनाशने साक्षीदार म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. पोलिसांचा खबरी म्हणून अविनाशचे गुन्हे शाखेतील अनेक पोलिसांशी चांगले संबंध होते. 

वाईट संगतीमुळे झाला खून ?

दहा वर्षांपूर्वी अविनाशच्या एका मित्राला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. पाहिजे आरोपी  सध्या जामीनावर बाहेर असून अविनाश आणि त्याची चांगली मैत्री आहे. त्या मित्राला अमली पदार्थाचे व्यसन असून मित्राच्या कौटुंबिक कलहात अविनाश मध्यस्थी म्हणून भूमिका पार पडायचा. मात्र, नेमकं अविनाश आणि त्याच्या मित्रामध्ये असं काय घडलं कि ज्यामुळे अविनाशच्या खून झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, पोलीसांचा प्राथमिक अंदाज हा अविनाशच्या खून मित्रानेच केला असल्याचा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच हा पाहिजे आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

२०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत अधिक महिती... चौघांना आजन्म कारावास

Web Title: The police's informer and key witness of major cases has murdere in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.