प्रसिध्द कवी सायमन मार्टीन यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:16 PM2019-04-16T13:16:27+5:302019-04-16T13:21:46+5:30

पोलिसांकडून भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजाविण्यात येते.

Police preventive notice issued to famous poet Simon Martin | प्रसिध्द कवी सायमन मार्टीन यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस

प्रसिध्द कवी सायमन मार्टीन यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस

ठळक मुद्देवसईत अनेकांना या नोटिसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. हातून दखलपात्र गुन्हा घडण्यास, हस्तकांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई कऱण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

वसई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टीन यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस पाठविल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या, निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्यांना पोलिसांकडून भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजाविण्यात येते. त्याप्रमाणे ही नोटीस बजावण्यात आली आहे. वसईत अनेकांना या नोटिसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे.

प्रसिध्द कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते  सायमन मार्टीन यांना देखील ही प्रतिबंधात्मक नोटीस पाठविण्यात आली आहे. हातून दखलपात्र गुन्हा घडण्यास, हस्तकांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई कऱण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. यामुळे वसईत मोठी खळबळ उडाली आहे. सायमन मार्टीन हे राज्य आणि केंद्र शासन पुरस्कारप्राप्त साहित्यिक असून सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. अशाप्रकारे त्यांना नोटिसा दिल्याने साहित्यिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसई पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

Web Title: Police preventive notice issued to famous poet Simon Martin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.