Police destroyed 1344 kg of ganja and destroyed them | पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट
पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी हा गांजा नष्ट करण्यात आला असून या गांजाची सध्याची किंमत १६ लाख ३५ हजार २१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.समुद्रपूर पोलिसांनी २०१२ मध्ये गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता.

वर्धा - समुद्रपूर पोलिसांनी एका कारवाई १ हजार ३४४ किलो गांजा जप्त केला होता. हा गांजा न्यायालयाच्या निकालाअंती गुरुवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जाळून नष्ट करण्यात आला. 

समुद्रपूर पोलिसांनी २०१२ मध्ये गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता. त्या ट्रक मधून १३ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी हा गांजा नष्ट करण्यात आला असून या गांजाची सध्याची किंमत १६ लाख ३५ हजार २१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, प्रदिप मैराळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढोले, पोलीस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात प्रदिप देशमुख, गिरीश कोरडे, परवेज खान, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, हितेंद्र परतेकी यांनी केली.


Web Title: Police destroyed 1344 kg of ganja and destroyed them
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

क्राइम अधिक बातम्या

आश्चर्य...रिकाम्या गोण्यांतून हजारो कोटींच्या हेरॉईनची तस्करी

आश्चर्य...रिकाम्या गोण्यांतून हजारो कोटींच्या हेरॉईनची तस्करी

3 hours ago

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या : सणसवाडीतील धक्कादायक घटना 

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या : सणसवाडीतील धक्कादायक घटना 

17 hours ago

वेश्या व्यवसायातून '' मॉडेल '' ची सुटका 

वेश्या व्यवसायातून '' मॉडेल '' ची सुटका 

18 hours ago

' बीव्हीजी ग्रुप' चे हणमंत गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक

' बीव्हीजी ग्रुप' चे हणमंत गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक

23 hours ago

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

1 day ago

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून 

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून 

1 day ago