निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 90 रिक्षाचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 04:25 PM2019-04-13T16:25:56+5:302019-04-13T16:29:01+5:30

पोलिसांच्या या मेगा कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Police camping operation in Kalyan on the backdrop of election | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 90 रिक्षाचालकांवर कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 90 रिक्षाचालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे90 रिक्षाचालकांवर मो.वा.का प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. बुधवार १२  एप्रिल रात्री 9 वाजल्या पासून ते गुरुवारी रात्री १ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी करण्यात आली.

कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात पुन्हा एकदा पोलिसांकडून नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. कल्याण परिमंडळात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून त्यात पाहिजे असणारे आरोपी पकडण्यासह साडेतीन लाखांची रोकडही भरारी पथकाने जप्त केली आहे. पोलिसांच्या या मेगा कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात कायदा सुव्यवस्था नियंत्रित राहावी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून बुधवार १२  एप्रिल रात्री 9 वाजल्या पासून ते गुरुवारी रात्री १ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी करण्यात आली. कल्याण परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांच्यासह 14  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, 215 कर्मचारी, 1 एसरपीएफ प्लॅटून असे तब्बल 250 हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अवैद्य गावठी दारू (प्रॉव्हिशन ) प्रकरणी 4 केसेस, अनधिकृत फेरीवाले, चायनीज गाडी, हॉटेल आस्थापाना यांच्या विरोधात  38 केसेस, सीआरपीसी ऍक्ट 151 प्रमाणे 32 केसेस , 37 हिस्त्रीसीटर चेक केले, ड्रक एन्ड द्राइव्ह 1 केस, नाकाबंदी दरम्यान लहान मोठी दुचाकी चार चाकी 323 वाहने चेक केली त्यापैकी 4 वाहनांवर मो.वा.का. प्रमाणे केसेस , भरारी पथक क्रमांक 4 यांचे सह कार्यवाहीत वाहने चेक केली, कारवाई दरम्यान 3,49,250/- रु वाहनातून जप्त ,पाहिजे व फरार 7 आरोपी मिळून आले ,भा.ह.का. कलम 4,25 सह BP Act 37(1)135 प्रमाणे 2 केसेस ,भा.द.वी. कलम 294 प्रमाणे 16 वारंगनावर कारवाई ,BP Act 110, 117 प्रमाणे 6 केसेस , 90 रिक्षाचालकांवर मो.वा.का प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Police camping operation in Kalyan on the backdrop of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.