शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:41 PM2018-10-20T15:41:02+5:302018-10-20T15:47:22+5:30

कोथरुडमधील एका इंग्लिश मीडियम स्कुलमधील तीन विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़.

police arrested a school peon who showing blue film to school girl students | शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देतीनही विद्यार्थिंनी वेगवेगळ्या वर्गात शिकत असून त्यातील दोन मुली १३ व एक १५ वर्षाचीअनेक महिने या मुलींनी हा प्रकार कोणाला न सांगता त्याचा जाच सुरु

पुणे : कोथरुडमधील एका इंग्लिश मीडियम स्कुलमधील तीन विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़. शाळेच्या शिपायाच्या या कृत्याने वैतागून या मुलींनी शाळेकडे तक्रार केली होती़. वडिलांना या प्रकाराची माहिती दिली़. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी शाळेकडे लेखी तक्रार केली़. त्यानंतर शाळेने कोथरुड पोलीस ठाण्यात शिपायाविरुद्ध फिर्याद दाखल केली़. संभाजी रघुनाथ चौधरी (वय ४७, रा़ शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिपायाचे नाव आहे़. ही घटना ३ फेबुवारी ते ५ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान घडली होती़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की,कोथरुड येथील पी बी जोग इंग्लिश स्कूलमधील तीन विद्यार्थिंनीसोबत तेथील शिपायाने हा प्रकार केला होता़.या तीनही विद्यार्थिंनी वेगवेगळ्या वर्गात शिकत असून त्यातील दोन मुली १३ वर्षाच्या एक १५ वर्षाची आहेत़. चौधरी याने या तिघींना वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी नेत जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ दाखविला होता़. त्यानंतर त्यांना शिवीगाळ केली़. सातत्याने अशा प्रकारे तो त्रास देत होता़. याबाबत कोणाला सांगू नये, अशी तो सर्वांना धमकी देत होता़. त्यामुळे अनेक महिने या मुलींनी हा प्रकार कोणाला न सांगता त्याचा जाच सहन केला होता़. त्याच्या या कृत्यांने वैतागून शेवटी त्यांनी शाळेच्या प्रमुख अधिकारी राजलक्ष्मी कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली़. त्यानंतर या मुलींनी आपल्या आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली़. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी शाळेकडे लेखी तक्रार केली़. 

Web Title: police arrested a school peon who showing blue film to school girl students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.