प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला चंदननगर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:49 PM2019-06-22T14:49:35+5:302019-06-22T14:49:39+5:30

प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती.

police arrested a boyfriend for murdred a girl friend in chandannagar | प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला चंदननगर पोलिसांनी केली अटक

प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला चंदननगर पोलिसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देखुनाचा गंभीर गुन्हा करून आरोपी झाला होता फरार

विमाननगर : प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती. या प्रकरणी फरार आरोपी किरण अशोक शिंदे (वय-26, रा. काळेवाडी, थेरगाव पुणे) याला चंदननगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी किरण शिंदे याने 11 जून रोजी प्रेयसी विना पटले हिचा चाकूने वार करून चंदननगर पाण्याच्या टाकीजवळ खून केला होता. खुनाचा गंभीर गुन्हा करून आरोपी फरार झाला होता. चंदननगर पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याला नुकतीच अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी विना पटले या युवतीचा एका तरुणाने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती. आरोपी खून करून फरार झाला होता. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वपूर्ण माहितीवरून हा खून विना पटलेचा मित्र किरण शिंदे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात किरण हा खुनाचा गुन्हा करून अहमदनगर व इतर भागात फिरत होता.त्यानंतर सात दिवसांपूर्वी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो रावेत येथे एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार चंदननगर पोलिसांनी आरोपी किरण शिंदे याला रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यावर ताब्यात घेऊन अटक केली.आरोपी  किरण शिंदे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे निरीक्षक राजेंद्र काळे, उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी सहाय्यक पोलीस फौजदार बारगुजे, पोलीस शिपाई भाऊ चव्हाण व अमित जाधव यांच्या पथकाने केला.

Web Title: police arrested a boyfriend for murdred a girl friend in chandannagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.