मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 07:11 PM2019-07-17T19:11:57+5:302019-07-17T19:22:19+5:30

रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले.

One person was arrested in case of dog death | मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

googlenewsNext

पिंपरी : भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे बेशुध्द झालेल्या कुत्रीचा मृत्यू झाला. वाकड येथे सोमवारी (दि. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपन सबुर एस. के. (वय २३, रा. वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता कुणाल सिंग (वय ३२, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रिपन याने सोमवारी रात्री साडेअकराला रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले. त्यामुळे फिर्यादी प्राजक्ता आणि त्यांच्या मित्रांनी कुत्र्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले. कुत्र्याचा मृत्यू झाला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर घोषित केले. सदर कुत्र्याला मारहाण करून छळ करून मारल्याप्रकरणी आरोपी रिपन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: One person was arrested in case of dog death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.