पुणे- पंढरपूर मार्गावरील अपघातात एक मृत्यू व एक गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 07:52 PM2019-02-12T19:52:57+5:302019-02-12T19:53:12+5:30

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील जेजुरी एमआयडीसी ते नीरा या दरम्यान सोमवारी रात्री सातला पातरमळा येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडत दिली.

One died and one seriously injured in an accident on Pune-Pandharpur road | पुणे- पंढरपूर मार्गावरील अपघातात एक मृत्यू व एक गंभीर जखमी 

पुणे- पंढरपूर मार्गावरील अपघातात एक मृत्यू व एक गंभीर जखमी 

Next

वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील जेजुरी एमआयडीसी ते नीरा या दरम्यान सोमवारी रात्री सातला पातरमळा येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडत दिली. या अपघातात मोटार सायकल स्वार अनिल संपत पवार (वय ३५ , रा. अंबाजीचीवाडी, ता. पुरंदर) हे जागीच मृत्यू झाले. तर मागे बसलेले संदीप भरत महांगडे हे गंभीर जखमी झाले आहेत. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल व संदीप हे जेजुरी एमआयडीसीमधून कामावरून सुट्टी झाल्यावर घरी वाल्हे येथील अंबाजीचीवाडी येथे जात असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान जखमी महांगडे यांना प्रथम वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले व नंतर जेजुरी येथील खासगी आयसीयू हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान वेगणार गाडी ही वाल्हे येथीलच असल्यामुळे व गाडीचा चालक व मालक संजय बबन भुजबळ (वय ५२) हे पळून गेल्यामुळे मंगळवारी सकाळी अंबाजीचीवाडी येथील मुलांनी वाल्हे पोलीस चौकी समोर मोठी गर्दी केली होते. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. मात्र चारचाकी चालकावरती जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: One died and one seriously injured in an accident on Pune-Pandharpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.