ओएलएक्सवर आयफोन विकायला गेला आणि पडल्या शिव्या, ट्विटरवरून पोलिसांना केली तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 07:46 PM2018-08-18T19:46:16+5:302018-08-18T21:02:52+5:30

वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे.  

On Olx went to sell the iPhone and got bad words, victim tweeted for the complaint to the Mumbai Police | ओएलएक्सवर आयफोन विकायला गेला आणि पडल्या शिव्या, ट्विटरवरून पोलिसांना केली तक्रार  

ओएलएक्सवर आयफोन विकायला गेला आणि पडल्या शिव्या, ट्विटरवरून पोलिसांना केली तक्रार  

googlenewsNext

मुंबई - ओएलएक्स या वस्तू खरेदी-विक्रीसाठी असलेल्या वेबसाईटवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला आयफोन विकण्यासाठी मुकेश मखिजा यांनी ओएलएक्सची मदत घेतली होती. ओएलएक्सवर त्यांनी त्यांच्या आयफोनची माहिती दिली होती. त्यांनतर एका अज्ञात व्यक्तीने वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का? असा सवाल मखिजा यांना विचारला. त्यावर मखिजा यांनी नकार दिला. त्यावर त्या अज्ञात व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. मखिजा यांनी या वाईट प्रकाराबद्दल ट्वीट करून मुंबईपोलिसांना याची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याविषयी सांगितलं आहे. माखिजा हे सामाजिक कार्यकर्ता आहेत. 

Web Title: On Olx went to sell the iPhone and got bad words, victim tweeted for the complaint to the Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.