जन्मदात्या आईला मुलगी झाली 'नकुशी'; १८ दिवसाच्या बाळाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:54 PM2018-11-29T20:54:32+5:302018-11-29T20:58:58+5:30

सेलेस्टिन असं या विकृत महिलेचे नाव असून दुसरीही मुलगी झाल्याने चिडलेल्या नवऱ्याच्या रागाने मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

'Nukushi' was born to mother's daughter; 18-day-old baby murdered | जन्मदात्या आईला मुलगी झाली 'नकुशी'; १८ दिवसाच्या बाळाची केली हत्या

जन्मदात्या आईला मुलगी झाली 'नकुशी'; १८ दिवसाच्या बाळाची केली हत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे सेलेस्टिनच्या नवऱ्याचे याआधी देखील एक लग्न झाले होतेपुन्हा मुलगी झाल्याने सेलेस्टिनवर तिचा पती चिडला होता 18 दिवसांच्या मुलीला उचलले आणि जमिनीवर आपटले

तामिळनाडू - जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईने १८ दिवसाच्या बाळाची हत्या केली आहे. बाळाला जमिनीवर आपटून ही हत्या करण्यात आली आहे. सेलेस्टिन असं या विकृत महिलेचे नाव असून दुसरीही मुलगी झाल्याने चिडलेल्या नवऱ्याच्या रागाने मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

तामिळनाडूत कासिमेडू परिसरात सेलेस्टिन ही नवरा आणि आपल्या दोन वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. सेलेस्टिनच्या नवऱ्याचे याआधी देखील एक लग्न झाले होते. आधीच्या बायकोपासून सेलेस्टिनच्या पतीला एक तीन वर्षांचा मुलगा असल्याचे सेलेस्टिनला समजले होते. यावरुन सेलेस्टिन फार दुखी होती. १२ नोव्हेंबर रोजी सेलेस्टिन हिची प्रसूती झाली आणि तिला दुसरीही मुलगी झाली. पुन्हा मुलगी झाल्याने सेलेस्टिनवर तिचा पती चिडला होता. त्यांच्यात यावरुन खटके देखील उडू लागले. त्यामुळे चिडून सेलेस्टिनने तिच्या 18 दिवसांच्या मुलीला उचलले आणि जमिनीवर आपटले. यात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सेलेस्टिनने तिच्या आईला फोन करुन आपल्या मुलीचा दूध पाजताना बाळाचा श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर आईने धाव घेत सेलेस्टिनच्या घरी गेली असता बाळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तिने बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेत सेलेस्टिनच्या आईने डॉक्टरांना बाळ दूध पिताना श्वास गुदमरल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांनी बाळाला तपासल्यानंतर बाळाचा मृत्यू गुदमरल्याने झाला नसल्याचे सांगितले. तसेच याबाबत पोलिसांना डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर सेलेस्टिनची चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला असून क्रूर महिलेला अटक करण्यात आली आहे.

Web Title: 'Nukushi' was born to mother's daughter; 18-day-old baby murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.