५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करून हत्या करणारा नराधम जेरबंद 

By पूनम अपराज | Published: February 8, 2019 03:55 PM2019-02-08T15:55:50+5:302019-02-08T15:56:22+5:30

त्यानंतर माहीम पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमाने या गुन्ह्याची उकल केली आणि आरोपी मेहंदीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Naradham Jeerband, who was assassinated by sexual assault of 5-year-old Chimukali | ५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करून हत्या करणारा नराधम जेरबंद 

५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करून हत्या करणारा नराधम जेरबंद 

Next
ठळक मुद्दे नराधम मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) या आरोपीला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या गळ्यावर खुणा असल्याने तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला होता. अटक आरोपी शेख हा माहीम परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे. 

मुंबई - माहीम परिसरात फुटपाथवर झोपलेल्या  ५ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर हत्या करणारा नराधम मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) या आरोपीला माहीम पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. त्यानंतर माहीम पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमाने या गुन्ह्याची उकल केली आणि आरोपी मेहंदीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

काल सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षास माहीम परिसरात एक अनोळखी मृतदेह सापडल्याबाबत फोन प्राप्त झाला होता. नंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. या गंभीर घटनेनंतर पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके कामाला लागली. या परिसरातील दुकानाबाहेरील सीसीटीव्हीची झाडाझडती घेताना पोलिसांच्या हाती एक फुटेज लागले. यामध्ये एक इसम या मुलीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाताना दिसला. मात्र या फुटेजमध्ये तो पाठमोरा असल्याने चेहरा दिसत नसल्याचे पोलिसांनी कंबर कसून या परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, नशा करणारे तरुण यांची चौकशी केली. दरम्यान, मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेखला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.  
माहीमच्या रझाक मंजिलजवळ फुटपाथवर ही मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या पालकांसोबत बुधवारी रात्री झोपली. पहाटे पाचच्या सुमारास अपंग वडिलांना जाग आली त्यावेळी मुलगी शेजारी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांना सोबत घेऊन मुलीला शोधण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरात मुलगी कुठेच सापडली नाही. घाबरलेल्या आईवडिलांनी माहीम पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनीही पालकांसोबत या मुलीचा शोध सुरू केला. सकाळी साडेआठच्या सुमारास रझाक मंजिलपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या न्यू राजेंद्र अपार्टमेंटजवळील निर्मनुष्य ठिकाणी अर्धनग्न स्थितीमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला. या मुलीच्या गळ्यावर खुणा असल्याने तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला होता. अटक आरोपी शेख हा माहीम परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे. 



 

Web Title: Naradham Jeerband, who was assassinated by sexual assault of 5-year-old Chimukali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.