हत्या की अपघात! तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:42 PM2019-02-01T13:42:24+5:302019-02-01T13:46:00+5:30

आज सकाळी जयराम यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कारमध्ये आढळून आला.

Murder Accident! Suspicious death of owner of Telugu channel | हत्या की अपघात! तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

हत्या की अपघात! तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

ठळक मुद्देकोस्टल बँकेचे कार्यकारी संचालक देखील होते. आज सकाळी जयराम यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कारमध्ये आढळून आला.आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वरील नंदिगाव येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला बेवारस आढळली.

आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातील एक्सप्रेस टीव्ही या खासगी तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयस्पद मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. च‍िगुरपत‍ि जयराम असं त्याचं नाव असून ते कोस्टल बँकेचे कार्यकारी संचालक देखील होते. आज सकाळी जयराम यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कारमध्ये आढळून आला. त्याचप्रमाणे त्यांच्या कारचा चालक देखील बेपत्ता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. 

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वरील नंदिगाव मंडल येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला बेवारस आढळली. जयराम यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे.  

Web Title: Murder Accident! Suspicious death of owner of Telugu channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.