मुंबईतल्या सराफाला गोव्यात लुटले; दोघे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:40 PM2019-02-01T23:40:48+5:302019-02-01T23:41:53+5:30

भारतीय दंड संहितेच्या 394 कलमाखाली या संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

Mumbai's jweller robbed in Goa The two are behind the door | मुंबईतल्या सराफाला गोव्यात लुटले; दोघे गजाआड

मुंबईतल्या सराफाला गोव्यात लुटले; दोघे गजाआड

googlenewsNext

मडगाव - मुंबई येथील एका सरफाला लिफ्टमध्ये अडवून त्याला लुटण्याची घटना गोव्यातील दक्षिण गोव्यातील मडगाव येथे घडली असून, या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावताना दोघा बदमाशाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांचा अन्य एक साथिदार सदया फरार असून, शोध चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.
काल गुरुवारी रात्री नउ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. विक्रम जैन (56) असे तक्रारदाराचे नाव असून, ते मूळ गुजरात राज्यातील असून, मुंबईत ते वास्तव करुन राहतात. अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे.मनिष मेहता व मारियो सुकोर क्लेमेंत या दोघांना अटक केली आहे. भारतीय दंड संहितेच्या 394 कलमाखाली या संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावताना वरील दोघांना जेरबंद केले.
विक्रम यांचा गोव्यातील मडगाव भागातील पाजिफोंड येथील मिरा रेसिडेन्सी या इमारतीत फ्लॅट आहे. गोव्यात सोन्याच्या दागिन्याची ऑडर घेउन मग मुंबईहून ते बनवून आणण्याचा व्यवसाय ते करतात. 30 जानेवारी ते गोव्यात आले होते. मडगाव, वास्को व फोंडा भागात ऑडर घेउन काल रात्री ते आपल्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढले असता, तेथे आधीच दबा धरुन बसलेल्या दोघांने त्यांना घटट पकडले. या संशयितांनी तोंडात काळा बुरखा घातला होता. संशयितांनी जैन याला मारहाण करुन त्याच्या हातातील बॅग हिसकावून काढली. संशयितांपैकी एकाने त्याला ढकलून दिले व नंतर पळ काढला. नंतर जैन यांनी आराडाओरडा करुन संशयितांचा पाठलाग केला. संशयिताचा पाठलाग करीत संशयितांशी त्याची झटपटही झाली. संशयितांनी बॅग फेकून दिली असता, अन्य एकाने ती उचलून पळ काढला. नंतर घटनास्थळी लोकही जमले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलीसही घटनास्थळी धावून आले. पाजिफोंड येथे डोंगराळ भागात एक संशयित मारियो क्लेमेत हा दडी मारुन बसला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने मनिशमेहता याचेही नाव उघड केले. नंतर आके येथील मेहता याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्यालाही गजाआड केले. जैन याची बॅग सापडली आहे. या बॅगेत दोन सोनसाखळी तसेच पंधरा हजार रोकड होती.
मनिशहा या गुन्हयातील प्रमुख म्होरक्या असल्याचेही आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. तोही मूळ गुजरात राज्यातील आहे. मनिश व विक्रम हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचेही आहेत. सध्या मनिश हा आर्थिक गर्तेत सापडला असून, त्याला विक्रमबददल खडानखडा माहिती होती. मनिशनेच विक्रमला लुटण्याचा प्लॅन आखला होता व नंतर आपल्या साथिदाराच्या मदतीने तो तडीस लावला होता असे पोलीस तपासात आढळून आले आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनिषा म्हादरेळकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Mumbai's jweller robbed in Goa The two are behind the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.