मुलुंडमध्ये थैमान घातलेल्या सिरीयल मोलेस्टरला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:05 PM2019-02-15T18:05:53+5:302019-02-15T18:07:03+5:30

पोलिसांनी तपासाअंती घाटकोपर येथील आरसीटी मॉल येथून विरेन शहा (३८) याला ताब्यात घेतले.

In Mulund, the deadly serial Mallester was arrested | मुलुंडमध्ये थैमान घातलेल्या सिरीयल मोलेस्टरला अटक 

मुलुंडमध्ये थैमान घातलेल्या सिरीयल मोलेस्टरला अटक 

ठळक मुद्दे पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता तोच या गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर नवघर पोलिसांनी शहाला अटक केली आहे.  मुलुंड परिसरात सिरियल मोलेस्टरची धास्ती घेतली होती.

मुंबई -  ‘आज सोमवार है क्या..अरे पॅण्ट कमरसे निकलेगी’, आज मेकअप ज्यादा लगा है..अशा अश्लील शेरेबाजीसह शाळकरी, कॉलेज विद्यार्थीनी, तरुणींसह विवाहित महिलांना कपडे, तसेच त्यांच्या अंगकाठीवरुन छेड़छाडीच्या घटनांनी डोकं वर काढले होते. तसेच या सिरीयल मोलेस्टरने बुलेटवरून येऊन एका महिलेला अश्लील स्पर्श करून विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती घाटकोपर येथील आरसीटी मॉल येथून विरेन शहा (३८) याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता तोच या गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर नवघर पोलिसांनी शहाला अटक केली आहे.  मुलुंड परिसरात सिरियल मोलेस्टरची धास्ती घेतली होती. मुलुंडसह ठाणे परिसरात रात्री जेवणानंतर वॉकिंगला जाणाऱ्या तरुणी, महिला आणि एकट्या तसेच वृद्धांसोबत जात असलेल्या विद्यार्थीनीसह महिलांना अश्लील स्पर्श करणारा शहा या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: In Mulund, the deadly serial Mallester was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.