अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:16 PM2018-08-14T17:16:57+5:302018-08-14T17:18:59+5:30

गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या.

most wanted two wheeler theft arrested by Beed Police | अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ

अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ

googlenewsNext
ठळक मुद्दे-२७ दुचाकी जप्त; टोळीतील साथिदारांचा शोध सुरू

बीड : गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे (रा.नागडगाव ह.मु.गोविंदपुर ता.माजलगाव) या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचोराने एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अखरे बीड पोलिसांनीच सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या.

कालिदास हा दुचाकी चोरण्यात पटाईत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बीडसह परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर अशा जिल्ह्यांमधून त्याने दुचाकी पळविलेल्या आहेत. दुचाकी चोरांची एक टोळी असून कालिदास हा त्याचा म्होरक्या आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत गेल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. तर चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. राज्यातील पोलीस कालिदासच्या मागावर होती. परंतु तो हाती लागत नव्हता.

आज तो माजलगावहून गोविंदपुरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर व त्यांच्या टिमला सापळा लावण्यास सांगितले. दुचाकीवरून जात असतानाच त्याचा पाठलाग करून तेजनकर यांनी त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याच्या इतर साथिदारांचाही शोध सुरू असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले. लवकरच टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही ते म्हणाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, नसिर शेख, विष्णू चव्हाण, सतिष कातखडे, संतोष म्हेत्रे, गोविंद काळे, सुग्रिव रूपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.

१० गुन्हे उघड
गेवराई पोलीस ठाणे हद्दीत पाच, केज, धारूर, आष्टी, गोंदी व कळंब पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १० गुन्हे उघड झाले आहेत. 

इतर आरोपींचा शोध सुरू

एका दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून २७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्या इतर साथिदारांचा शोध सुरू आहे. तसेच त्याने चोरलेल्या दुचाकी कोणाला विक्री केल्या, याची माहिती घेणे सुरू आहे. लवकरच सर्व टोळी गजाआड करू. 
घनश्याम पाळवदे, पोनि, स्थानिक गुन्हे शाखा, बीड

Web Title: most wanted two wheeler theft arrested by Beed Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.