२ हजार अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग; भामट्या तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 09:05 PM2019-02-12T21:05:04+5:302019-02-12T21:07:09+5:30

सिराज रजीउद्दीन सिद्धीकी असे या 22 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे. 

Molestation by sending 2 thousand porn messages; Beaten young man arrested | २ हजार अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग; भामट्या तरुणास अटक

२ हजार अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग; भामट्या तरुणास अटक

Next
ठळक मुद्देसिराज हा ऑटोमोबाईल इंजिनिअर असून त्याने बोगस इस्टाग्रामवर तिला २ हजार मॅसेज पाठविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.तक्रारदार तरुणी ही जोगेश्वरी परिसरात राहत असून ती कॉलेजमध्ये इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिची भायखळा येथे राहणार्‍या सिराजशी ओळख झाली होती.

मुंबई - २ हजार अश्लील मॅसेज पाठवून एका 19 वर्षांच्या कॉलेज तरुणीचा विनयभंग करणाऱ्या भामट्या तरुणाला मेघवाडी पोलिसांनीअटक केली आहे. सिराज रजीउद्दीन सिद्धीकी असे या 22 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे. 

सिराज हा ऑटोमोबाईल इंजिनिअर असून त्याने बोगस इस्टाग्रामवर तिला २ हजार मॅसेज पाठविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत त्याने तिला सुमारे दोन हजार अश्लील मॅसेज पाठविले होते. त्यात त्याने तिच्या चारित्र्याविषयी अश्लील मेसेज करुन तिच्यावर टिका केली होती. या मॅसेजनंतर तिने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश देवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेश कालापाड यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

तक्रारदार तरुणी ही जोगेश्वरी परिसरात राहत असून ती कॉलेजमध्ये इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिची भायखळा येथे राहणार्‍या सिराजशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर चांगल्या मैत्रीत झाले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. काही वेळा तो तिला भेटण्यासाठी येत होता. दरम्यान, त्याने तिला प्रपोज केले होते. मात्र, तिने तिचा प्रियकर असल्याने त्याला नकार दिला होता. त्यामुळे सिराज चिडलेला होता. तिला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने बोगस मेलवरुन इस्ट्राग्रामवर तिचे बोगस अकाऊंट तयार केले होते. त्यात त्याने दुसर्‍याच व्यक्तीचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर तो याच अकाऊंटवरुन तिला अश्लील मॅसेज पाठवून त्रास देत होता. 

Web Title: Molestation by sending 2 thousand porn messages; Beaten young man arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.