उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, ओशिवऱ्यात शिक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 03:12 AM2018-11-22T03:12:44+5:302018-11-22T03:12:58+5:30

उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार जोगेश्वरीच्या खासगी शिकवणीत घडला. मंगळवारी या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तेथील शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

molestation of the girl's students by measuring the height, the teacher was arrested in Oshawa | उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, ओशिवऱ्यात शिक्षकाला अटक

उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, ओशिवऱ्यात शिक्षकाला अटक

Next

मुंबई : उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार जोगेश्वरीच्या खासगी शिकवणीत घडला. मंगळवारी या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तेथील शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
रेहान अब्दुल रेहमान अन्सारी (४६) असे अटक शिक्षकाचे नाव आहे. तो बेहरामबागमध्ये एच आर कोचिंग क्लासेस नावाने खासगी शिकवणी घेतो. १६ वर्षीय वर्षा (नावात बदल) अंधेरीत राहत असून, अन्सारीकडे शिकवणीसाठी जायची. मंगळवारी संध्याकाळी ६च्या सुमारास अन्सारीने वर्षाला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात बोलावले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर तिची उंची मोजण्याच्या बहाण्याने तिचे टी शर्टवर करत, अश्लील चाळे केले. घाबरलेल्या वर्षाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच अन्सारीने तिचे तोंड दाबले. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून वर्षा घरी पोहोचली. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: molestation of the girl's students by measuring the height, the teacher was arrested in Oshawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.