जमावाने हार चोरट्यांसोबत साध्या वेशातील पोलिसांनाही केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:29 AM2019-05-10T01:29:16+5:302019-05-10T01:29:27+5:30

हळदीचा समारंभ आटोपून दुचाकीवरून जाणा-या दाम्पत्याचा भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर पाठलाग करुन मागे बसलेल्या पत्नीच्या गळ््यातील हार मागून येणा-या दुचाकीस्वारांनी हिसकावून घेतला.

The mob lynched the police in simple festivities with the thieves | जमावाने हार चोरट्यांसोबत साध्या वेशातील पोलिसांनाही केली मारहाण

जमावाने हार चोरट्यांसोबत साध्या वेशातील पोलिसांनाही केली मारहाण

Next

भिवंडी - हळदीचा समारंभ आटोपून दुचाकीवरून जाणा-या दाम्पत्याचा भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर पाठलाग करुन मागे बसलेल्या पत्नीच्या गळ््यातील हार मागून येणा-या दुचाकीस्वारांनी हिसकावून घेतला. मात्र त्या चोरांना माणकोली नाक्यावर पकडून नागरिकांनी मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना खाजगी मोटारीमधून आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी हस्तक्षेप करताच जमावाने त्यांनाही मारहाण केली. नारपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दागिने चोरणा-या चोरांसह पोलिसांवर हात उगारणा-या सहा जणांना अटक केली आहे.

भरोडी गावातील सुवर्णा प्रदीप भगत या पती सोबत टेमघर येथून हळदीचा समारंभ आटोपून भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरून बुधवारी रात्री घरी जात होत्या. दरम्यान पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या युवकाने सुवर्णा हिच्या गळ््यातील हार हिसकावून पळ काढला. सुवर्णा यांनी आरडाओरड केली असता माणकोली नाक्यावर उभ्या असलेल्या टेम्पो चालकाने चोरांची दुचाकी अडवली. त्यावेळी नाक्यावर असलेल्या जमावाने चोरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी नारपोली पोलीस ठाण्याचे साध्या वेशातील पोलीस कारने घटनास्थळी पोहोचले.

तेव्हा परिसरांतील नागरिकांनी मोटारी भोवती गराडा घातला. त्यांना मोटारीमध्ये लोखंडीरॉड, कटावणी, हातोडा आढळून आल्याने जमावाने गैरसमजातून साध्या वेशातील पोलिसांवर हात उगारला व मोटारीवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांच्या मोटारीचे नुकसान झाले. ही घटना समजताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे व सहा. पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर हे फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी दागिने चोरणारा निलेश भोईर, पोलिसांवर हात उगारणारे ऋषिकेश जोशी (२१), सूर्याजी दिवेकर (२९), प्रफुल्ल पाटील (२९), परेश पाटील (२९), राहुल पाटील (२४), मनोज भगत (२६) या सहाजणांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक केली. सर्व आरोपींना भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: The mob lynched the police in simple festivities with the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.