मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : पोलिसांनी केली भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:14 PM2019-05-30T16:14:23+5:302019-05-30T16:14:49+5:30

मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर हा महिनाभर फरार होता असून त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या 

MNS worker assualted Case: Police arrested BJP corporator Vijay Chipalekar | मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : पोलिसांनी केली भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरला अटक 

मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : पोलिसांनी केली भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्दे२९ एप्रिलला मतदानादिवशी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कामोठे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर २९ एप्रिलला जीवघेणा हल्ला केला होता.

नवी मुंबई - मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींना कामोठे पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींची नावे मयूर चिपळेकर, तेजस म्हात्रे आणि किरण सोलकर अशी नावे आहेत. मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर हा महिनाभर फरार होता असून त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर २९ एप्रिलला जीवघेणा हल्ला केला होता. विजय चिपळेकर यांनी आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला होता. २९ एप्रिलला मतदानादिवशी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाला होते. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात समोर येत आले. २९ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कट रचून हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 



 

Web Title: MNS worker assualted Case: Police arrested BJP corporator Vijay Chipalekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.