शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:16 PM2018-11-17T18:16:01+5:302018-11-17T18:16:16+5:30

माहेराहुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा तिच्या सासरच्या घरातील लोक नेहमी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करत होते.

Married women committed suicide in Shirur taluka due to family torture | शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी चार संशयित आरोपींना अटक

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा ता. शिरुर येथील विवाहितेने पैशांसाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने शेतातील आंब्यांच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना शुक्रवारी (दि. १६) घडली. मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. 
 मंगल राजाराम शिंदे (वय ३१)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.या घटनेतील संशयित आरोपी राजाराम तुळशीराम शिंदे(पती),मच्छिंद्र तुळशीराम शिंदे(दिर),सुमन तुळशीराम शिंदे (जाव),महेंद्र मच्छिंद्र शिंदे(पुतण्या) अशी याप्रकरणी पोलिसांनीअटक केलेल्या आरोपींची नावे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील पिंकाना पाणी देत असताना आपणांस भावजय मंगल शिंदे यांचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत विवाहितेला माहेराहुन पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या घरातील लोक नेहमी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करत होते. काही दिवसांपासून माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून मयत महिलेचा नवरा,दीर,जाव व पुतण्या जाच करत होते,अशी तक्रार मयत मंगल शिंदेचा भाऊ दिपक दत्ताञय साळूंके यांनी पोलिसांकडे दिली आहे.या घटनेतील मयत महिलेचे शवविच्छेदन न्हावरे येथे राञी दीड वाजता झाले,परंतु जोपर्यंत संशयित आरोपिंना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भुमिका मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतल्याने मयत महिलेचा मृतदेह दुसऱ्यादिवशी दुपारी १२ वाजेपर्यत ग्रामीण रुग्णालयातच होता. पोलिसांनी याप्रकरणात मध्यस्थी केल्यावर नातलगांनी महिलेचा मृतदेह शिरसगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेला. करण्यात आले.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.

Web Title: Married women committed suicide in Shirur taluka due to family torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.