मनोजच्या हत्येसाठी दिली होती ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:26 PM2018-10-15T17:26:50+5:302018-10-15T17:28:49+5:30

कुशवाह याने 5 महिन्यांपूर्वी राजेंद्र अहिरवार (वय ३०) आणि हेमेंद्र कुशवाह (वय १९) या दोघांना मौर्या याच्या हत्येची सुपारी दिली.

Manoj was given 50 thousand beetle for the murder, the killer was awake | मनोजच्या हत्येसाठी दिली होती ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड 

मनोजच्या हत्येसाठी दिली होती ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड 

Next

मुंबई - नुकतीच  दादर फुलमार्केटसारख्या गजबजलेल्या परिसरात शुक्रवारी  सकाळी  साडे सात वाजताच्या सुमारास मनोजकुमार मौर्य (वय ३५) या  इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपींविरोधात दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान दिल्लीतील व्यावसायिकाने ही हत्या घडवून आणली असल्याचे उघड झाले आहे. मनोजकुमार मौर्याची हत्या करण्यासाठी व्यावसायिकासह दोन शूटर्सना बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. या व्यवसायिकाने दोन शार्पशुटरना  ५० हजाराची सुपारी दिली होती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

दिल्लीतील व्यावसायिक राधाकृष्ण कुशवाह (वय ३७) असं या आरोपीचे नाव असून त्याचा डिझेल बुस्टर बनविण्याचा व्यवसाय होता. 2015 ते 2017 या काळात मौर्या यांची पत्नी त्याच्याकडे नोकरी करत होती. तेथे झालेल्या वादानंतर मौर्या पत्नीला घेऊन मुंबईला निघून आला. याच वादानंतर कुशवाह याने 5 महिन्यांपूर्वी राजेंद्र अहिरवार (वय ३०) आणि हेमेंद्र कुशवाह (वय १९) या दोघांना मौर्या याच्या हत्येची सुपारी दिली.

मनोजचा मोबाइल उलगडणार हत्येचे गूढ; पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 

Web Title: Manoj was given 50 thousand beetle for the murder, the killer was awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.