गेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:41 PM2019-04-15T18:41:17+5:302019-04-15T18:44:21+5:30

या दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

In the last 2 days, 90 lakh cash seized from South Mumbai | गेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त 

गेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त 

Next
ठळक मुद्दे दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे कमिशन घेऊन रोख कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या तियुश कावेडिया याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ५० लाख रुपये इतकी संशयीत रक्कम जप्त केली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या २ दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळया कारवाईत 90 लाखांची रोख संशयीत रक्कम  जप्त करण्यात आली आहे. 

१३ एप्रिल रोजी आयकर विभाग, मुंबई (चौकशी पथक) यांच्याकडून दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे कमिशन घेऊन रोख कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या तियुश कावेडिया याच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी ४० लाखांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाईत निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाख रुपये इतकी संशयीत रक्कम जप्त केली.  १३एप्रिल शनिवार रात्री सुमारास ताडदेव परिसरात पारसी अगयारी जवळ, सरदार पावभाजी चे पुढील बाजूस, ताडदेव रोड, ताडदेव सर्कल, मुंबई येथे फिरत्या तपासणी पथकाला पाहणी करीत असता, लाल रंगाच्या लॅन्ड रोव्हर (डिस्कवरी) या मोटार कारची (एम.एच.01 सी.एच.0707) तपासणी केली. त्यात प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्याकडे ५५० लाख रुपये संशयीत रक्कम आढळून आली. या दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.



 

Web Title: In the last 2 days, 90 lakh cash seized from South Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.