For the ladies, 'That' jawan became virtually angel! | Video : महिलांसाठी 'तो' जवान अक्षरशः देवदूत बनून आला!
Video : महिलांसाठी 'तो' जवान अक्षरशः देवदूत बनून आला!

मुंबई - वारंवार रेल्वे स्थानकात अनेकांचे जीव वाचविण्यासाठी जीआरपीचे जावं देवदूत बनले आहेतच. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या दोन अनुयायी महिलांचा जीव लोकलखाली जाता जाता जीआरपीच्या जवानांनी काल वाचविला आहे. ही घटना काल सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

पश्चिम मार्गावरील दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली. बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर थांबली. दरम्यान लोकलमधून प्रवासी उतरले आणि चढले. मात्र. दोन पांढऱ्या साडीतील महिला लोकल सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उतरल्या. मात्र, धावत्या लोकलमधून उतरणं या महिलांच्या जीवाशी बेतलं असतं मोठा अपघात होता होता जीआरपी जवानांमुळे टळला आहे. परंतु जीआरपीच्या जवानामुळे त्यांचा जीव वाचला. ही घटना पाहताच प्रसंगावधान दाखवून जवान या महिलांच्या दिशेने धावले आणि प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅपमध्ये जाण्यापासून महिलांना वाचविले. 


Web Title: For the ladies, 'That' jawan became virtually angel!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.