King Khan's 'Zero' film dispute in High Court | किंग खानच्या 'झीरो' सिनेमाचा वाद उच्च न्यायालयात
किंग खानच्या 'झीरो' सिनेमाचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई - २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार किंग खान शाहरुखचा चित्रपट झीरोच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने  कृपाण धारण केल्याने शीख समुदाय नाराज असल्याने ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच झीरो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.   

किंग खान शाहरूखच्या ‘झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आणि चाहते बेभान झाले. रिलीजनंतरच्या अवघ्या २४ तासांत ५.४ कोटींवर लोकांनी ‘झिरो’चा ट्रेलर बघितला आणि याचसोबत देशात २४ तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरमध्येही याचा समावेश झाला आहे. असं असलं तरी झिरो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नुकतेच कारण दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. किरपान हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धार्मिक ते धारण करतात. मात्र, या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता मुंबई उच्च न्यायालयात देखील या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाड्यात सापडला आहे.    


Web Title: King Khan's 'Zero' film dispute in High Court
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.