पाकिस्तान, अमेरिकेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या ISI एजंटला नागपुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:52 PM2018-10-08T14:52:26+5:302018-10-08T19:21:52+5:30

या आयएसआय एजंटचं नाव निशांत अगरवाल असून तो गेली चार वर्ष ब्राह्मोस अॅरोस्पेस विभागात नोकरी करत होता. त्याला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे

ISI agents leak secrets of bramhos missle to Pakistan and US who get arrested | पाकिस्तान, अमेरिकेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या ISI एजंटला नागपुरात अटक

पाकिस्तान, अमेरिकेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या ISI एजंटला नागपुरात अटक

Next

नागपूर - ब्राह्मोस अॅरोस्पेस प्लांट विभागातून उत्तर प्रदेश दहशतवादी पथकाने (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजंट अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करत आयएसआय आणि अमेरिकन गुप्तचर विभागाला ब्राह्मोस मिसाईलबाबत गुप्त ठेवलेली महत्वपूर्ण माहिती पुरविणाऱ्या एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आयएसआय एजंटचं नाव निशांत अगरवाल असून तो गेली चार वर्ष ब्राह्मोस अॅरोस्पेस विभागात नोकरी करत होता. त्याला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. 

 निशांतला राहत्या घरातून तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचं म्हणजे गेली चार वर्ष गुप्तपणे काम करणाऱ्या निशांतबाबत कोणाला संशयही आला नाही. निशांतला २०१७ - १८ चा यंग सायंटिस्ट अॅवॉर्डने गौवरविण्यात आले होते. तपास यंत्रणा याप्रकरणी निशांतची पुढील चौकशी करत आहे. चार महिन्यांपूर्वी निशांतचे  लग्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूरच्या उज्वल नगर येथील ५०/७ या मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहतो. नागपूरला येण्याआधी निशांत हैदराबाद येथे कार्यरत होता.





 

निशांतचे घर जेथून त्याला अटक करण्यात आली

यंग सायंटिस्ट अॅवॉर्ड स्वीकारताना निशांत अगरवाल  

Web Title: ISI agents leak secrets of bramhos missle to Pakistan and US who get arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.