आयपीएल सट्टा: निर्माता पराग संघवीने आपल्यावरील आरोप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:50 PM2018-06-06T18:50:34+5:302018-06-06T18:50:34+5:30

आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू जलान याने चित्रपट निर्माते पराग संघवी आपले भागीदार असल्याचा दावा केला असला तरी संघवी यांनी त्याचे हे सर्व आरोप ठाणे पोलिसांनी बुधवारी केलेल्या चौकशीत फेटाळले आहेत.

IPL betting: Producer Parag Sanghvi rejects his charge | आयपीएल सट्टा: निर्माता पराग संघवीने आपल्यावरील आरोप फेटाळले

निर्माता साजीद खानला क्लीन चीट

Next
ठळक मुद्देअरबाज आणि संघवी दोघेही होणार साक्षीदारनिर्माता साजीद खानला क्लीन चीटपराग संघवींची ठाणे पोलिसांनी केली चौकशी


ठाणे: सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएलवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंध तोडले असून आपण त्याच्याशी सट्टयावर कोणतीही भागीदारी केली नसल्याचा दावा चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक पराग संघवी यांनी ठाणे पोलिसांकडे बुधवारी केला.
पराग संघवी हे आपले भागीदार असल्याची माहिती कुख्यात सट्टेबाज सोनू जलान याने ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या चौकशी त दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याची शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्यावरील हे आरोप फेटाळून सोनूशी गेल्या दीड वर्षापासून संबंध तोडल्याचा दावा केला.
मुंबईतील जूहू येथील एका हॉटेलमध्ये पराग आणि सोनूची तीन ते चार वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणेही व्हायचे. साधारण, दीड वर्षांपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्याने सोनूला अटक केली होती. तेंव्हा सोनू एक मोठा बुकी असल्याची माहिती मिळाली. पण, त्यानंतर आपण त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्याच्याशी आपली क्रिकेटवरील जुगाराची कोणतीही भागीदारी नसल्याचा दावा संघवी यांनी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले. संघवी यांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी केली जाणार असून त्यांचे व्यवहारही तपासले जाणार आहेत. गरज पडली तर संघवींना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाईल. चित्रपट अभिनेता अरबाज खानला या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे. तसा जबाब भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ नुसार न्यायालयासमोर नोंदविला जाणार आहे. अरबाज प्रमाणेच आता संघवींचाही जबाब १६४ नुसार नोंदविला जाणार असून त्यांनाही या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे.
.........................
निर्माता साजीद खानला क्लीन चीट?
याचा चित्रपट निर्माता पराग संघवीप्रमाणेच दिग्दर्शक निर्माता साजीद खान याचेही नाव बेटींगमध्ये सोनूने पोलिसांच्या चौकशीमध्ये घेतले होते. परंतू, हा प्रकार सात वर्षांपूर्वीचा असल्यामुळे साजीद यांना चौकशीला बोलविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे प्रदीप शर्मा यांनी स्पष्ट केले.

Web Title: IPL betting: Producer Parag Sanghvi rejects his charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.