‘त्या’ फरार सराफा व्यावसायिकाची अंबरनाथमध्ये जमिनीत गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 04:24 AM2018-11-20T04:24:30+5:302018-11-20T04:24:43+5:30

आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे फरार मालक अजित कोठारी यांनी अंबरनाथमध्ये जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या हाती आली आहे.

 Investigators of the land in Ambarnath | ‘त्या’ फरार सराफा व्यावसायिकाची अंबरनाथमध्ये जमिनीत गुंतवणूक

‘त्या’ फरार सराफा व्यावसायिकाची अंबरनाथमध्ये जमिनीत गुंतवणूक

Next

डोंबिवली : आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे फरार मालक अजित कोठारी यांनी अंबरनाथमध्ये जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या हाती आली आहे. या प्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढत असून फसवणूक झालेल्यांपैकी २८ गुंतवणूकदार आतापर्यंत पुढे आले आहेत.
रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कोठारी यांच्या चारही भावांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत कोणकोणते व्यवहार केले, त्या कागदपत्रांची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. गुप्त पद्धतीने त्यांच्या सर्व नातेवाइकांवर नजर ठेवण्यात येत असून आरोपी निश्चित सापडेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
खबरी आणि पोलीसमित्रांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कोठारी फरार झाल्यापासून त्यांचे डोंबिवली रिजन्सी संकुलातील घर बंद आहे. या घरावरही नजर असून त्यांचा मोबाइल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयएमईआय नंबरवरून त्यांचे फरार होण्यापूर्वीचे लोकेशन तपासण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी नेमण्यात आलेली दोन्ही पथके सतर्क असून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. आरोपीचे कोणतेही दुबई कनेक्शन उघड
झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोठारी यांनी बदलापूर, मानपाडा, अंबरनाथ, ठाणे, मुंबई आदी भागांमध्ये व्यवहार केल्याची पोलिसांची माहिती आहे. बांधकाम क्षेत्रात त्यांनी २० टक्के, १५ टक्के भागीदारी तत्त्वावर गुंतवणूक केल्याचीही माहिती समोर येत आहे. मिळालेली कागदपत्रे आणि बँक पासबुकच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचा तपशील घेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

२७ गुंतवणूकदारांच्या तक्रारी
आतापर्यंत फसवणूक झालेल्या २७ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सोमवारी या तक्रारदारांमध्ये एकाची वाढ झाली. नव्या तक्रारदारास आरोपीने ५.५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. फसवणुकीचा एकूण आकडा दोन कोटी ६५ लाख ५० हजारांवर पोहोचला असून एकूण सात कोटींची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title:  Investigators of the land in Ambarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.